वातावरण अपडेट
महाराष्ट्र वातावरण अंदाज: राज्यात पुढच्या ३ दिवसांत धुवांधार पाऊस, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
एक जून ते २४ जुलै या कालावधीत कोकणात सरासरीपेक्षा १९ टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात ३७ टक्के, मराठवाड्यात ७१ टक्के आणि विदर्भात ४९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११ टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती 'आयएमडी'च्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
महाराष्ट्र - हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या ३ दिवसांत राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवाती झालेल्या धुवांधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती ओढावली होती. पण सध्या पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.