Odisha Train Accident : बेंगळुरू-हावडा ही एक्स्प्रेस मेन लाइवरून जात होती. यावेळी या गाडीचे दोन डबे रूळावरून घसरले. रूळावरून घसरलेल्या डब्यांना बाजूच्या रूळावरून वेगाने धावत असलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसने धडक दिली. यामुळे एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरले. दुर्घटनेच्या ठिकाणी अतिशय विदारक दृश्य होतं.
भुवनेश्वर : ओडिशाचा बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० हून अधिक जण जखमी आहेत. अजूनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यांमध्ये अडकून असल्याचं सांगण्यात येत आहे. एनडीआरएफ आणि इतर सर्व यंत्रणांकडून कालपासून बचावकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Balasore Train Accident: अपघातानंतर वारसांसमोर दुसरंच संकट; नातेवाईकांना मृतदेहच ओळखता येत नाही…
कोलकाता : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांसमोर आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघातात मृत पावलेल्या नातेवाईकांना मृतदेह मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आता मृतदेहांची ओळख पटत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. तर त्याच वेळी, भुवनेश्वरमधील अनेक पीडित कुटुंबीयांनी दावा केला आहे की त्यांना कोणाचेही मृतदेह देण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यापासून काही नातेवाईक त्यांच्या संबंधातील व्यक्तींचा मृतदेह शोधत आहेत. तर दुसरीकडे डीएनए चाचणीचा निकाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येतील असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.भुवनेश्वर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितले की, काही नातेवाईकांना आता त्यांच्या लोकांचे मृतदेह मिळत नसल्यामुळे विलंब होत आहे.या कारणामुळेच डीएनए चाचणी आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळेच ही प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त असावी असंही सांगण्यात आले आहे.
😢🙏