YouTube वर कशाप्रकारे केली जाते कमाई? १००० subacriber आणि , ४००० hrs watchtime च काय आहे सत्य, जाणून घ्या ?
YouTube वरुन कशी होते कमाई?
वेगवेगळ्या विषयांवर रिल्स बनवल्या जातात. त्यांच्या कंटेटवर येणाऱ्या जाहीरातीवरून पैसे मिळतात. हे पैसे वेगवेगळ्या कंटेंटनुसार कमी-जास्त असतात. वास्तविक YouTubeवरुन मिळणारे पैसे हे कंटेंट, रीजन आणि इतर गोष्टींवर अवलंबून असतात. कंटेंट क्रिएटर्सची 55 टक्के कमाई जाहीरातीतून होते.
युजर्स ला YouTube Partner Program चा भाग असावा लागतं. तसंच क्वालीफाय होण्यासाठी चॅनेलवर 1000 सबस्क्राईबर्स आणि 4000 तासांचा वॉचटाईम असावा लागतो. YouTube Shorts च्या माध्यमातूनही आपण कमाई करु शकतो.
2022 डेटानुसार अमेरिकेतील युट्यूबर्स जवळपास 4600 डॉलर्स म्हणजे 3,77,234 रुपये महिन्याला कमवतात. युट्यूब क्रिएटर्सला 1000 व्ह्यूजवर 18 डॉलर म्हणजे 1558 रुपयांची कमाई होते. कंटेंट क्रिएटर्सची कमाई त्याचा कंटेंट किती स्ट्राँग आहे, प्रेक्षक, व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्सच्या माध्यमावर ठरतो.
याशिवाय YouTube Shorts, मेंबरशिप आणि इतर पद्धतीनेही पैसे कमावता येतात. तुमचा कंटेंट चांगला आणि आवडणारा असेल तर तुम्ही महिन्याला पाच आकड्यांचीही कमाई करु शकता. कंपनी क्रिएटर्सला त्याच्या YouTube चॅनेल आणि कंटेंटवर येणाऱ्या इंगेजमेंट तसंच व्ह्यूजच्या माध्यमातून पैसे मिळतात. ही रक्कम 1000 डॉलर ते 10 हजार डॉलर्सपर्यंत असू शकते. युट्यूब व्हिडिओतील जाहिरातींच्या माध्यमातून कमाई पण होते आणि निम्मे पैसा क्रिएटर ला पण मिळतो.
अशाप्रकारे YouTube वरुन पैसे कमवले जातात.👍