Type Here to Get Search Results !

Rahane कोणत्या संघा कडून खेळणार

अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार, जाणून घ्या कधी रवाना होणार ❓





रहाणेने जानेवारीत केला करार 🤔


अजिंक्य रहाणेने जानेवारीमध्ये लीसेस्टरशायरसाठी करार केला होता आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, तो संघासाठी आठ प्रथम श्रेणी सामने आणि संपूर्ण रॉयल लंडन कप (५० षटकांची देशांतर्गत स्पर्धा) जून ते सप्टेंबर दरम्यान खेळणार होता. मात्र, भारतीय कसोटी संघात पुनरागमन केल्यामुळे तो या काऊंटी संघात सामील होऊ शकला नाही.


या प्रकरणाची माहिती असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'वेस्ट इंडिजमधील दोन कसोटी सामन्यांनंतर अजिंक्य थेट इंग्लंडला रवाना होईल (जे २४ जुलै रोजी संपणार आहे) आणि उर्वरित हंगामासाठी लीसेस्टरशायर काऊंटी संघात सामील होईल. तो ऑगस्टमध्ये रॉयल लंडन कपमध्ये खेळेल आणि कदाचित सप्टेंबरमध्ये चार काउंटी सामने खेळेल कारण त्याला मर्यादित षटकांच्या संघात स्थान मिळण्याची अपेक्षा नाही.


अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. याआधी २०१९ च्या हंगामात तो हॅम्पशायरकडून खेळला होता जेव्हा त्याला ५० षटकांच्या विश्वचषक संघातून वगळण्यात आले होते. WTC फायनलमध्ये भारताच्या पहिल्या डावात ८९ धावा करणाऱ्या रहाणेने अलीकडेच ८३ कसोटी सामन्यांत ५००० धावा पूर्ण केल्या.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.