Type Here to Get Search Results !

Biprjoy Cyclone update

 


 Weather Forecast : अरबी समुद्रातील बिपरजॉयचक्रीवादळ ताशी 150 किमी वेगाने गुजरातकडे पुढे सरकत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत गुजरातच्या किनारी भागात थैमान घालून हे पुढे राजस्थानकडे सरकत आहे. यामुळे ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 


नवी दिल्ली : अरबी समुद्रात थैमान घालणारं बिपरजॉय चक्रीवादळ हे ताशी १५० किमी वेगाने गुजरातकडे पुढे सरकत आहे. गुरूवारी सकाळपर्यंत ते गुजरातच्या किनारी भागाला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. खरंतर, सुरुवातीला या वादळाचा तडाखा महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला बसेल अशी भीती होती मात्र वादळानं मार्ग बदलल्याने ते गुजरातवरून थेट कराचीच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. यामुळे या भागांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून सौराष्ट्र किनाऱ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.  


पुढचे ४८ तास धोक्याचे पुढील ४८ तासांत बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र रुप घेत राजस्थानमध्ये प्रवेश करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वादळाची तीव्रता पाहता हवामान खात्याने राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये (बाडमेर, जोधपूर, जालोर, नागौर आणि पाली) रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस (१५० ते २५० मिमी) अपेक्षित आहे. तर १६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतकंच नाहीतर यावेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.


 वादळाचा सर्वाधिक प्रभाव १७ जून रोजी जाणवेल, असा अंदाज आहे.   चक्रीवादळाचा बुधवारपासूनच परिणाम राज्यात दिसू लागला. यावेळी जोरदार आणि थंड वारे वाहत होते. यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी रात्री आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी मंत्री लालचंद कटारिया, गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव, सीएस उषा शर्मा, डीजीपी उमेश मिश्रा आणि इतर अधिकारी उपस्थित होते. दुसरीकडे, गुजरातमध्ये १२ हजारांहून अधिक विद्युत खांब पडल्याची माहिती आहे आणि शेकडो गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे तर तब्बल ७४००० नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  


राज्यात ३ ते ४ दिवस पाऊस पडेल.. बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानमध्ये थैमान घालण्याचा अंदाज आहे. हे वादळ आज दुपारनंतर सौराष्ट्र-कच्छ आणि लगतच्या पाकिस्तानी भागात १५० किमी प्रतितास वेगाने अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हणून धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे वादळ १५ जूनच्या संध्याकाळपर्यंत, जाखाऊ बंदर (गुजरात) जवळील मांडवी आणि कराची (पाकिस्तान) ओलांडण्याची शक्यता असून अखेरच्या टप्प्यात ते अतिशय तीव्र चक्रीवादळाच्या रुपात धडकी भरवेल. 


तर पुढच्या ४८ तासांत हे वादळ राजस्थानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या मान्सून महाराष्ट्रात पोहोचला असला तरीही त्याचा प्रवास तळकोकणातून पुढे अपेक्षित वेगानं होत नाहीये. त्यामुळं मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये उष्णतेचा कहरदेखील जाणवणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.